साने गुरुजी जयंती निमित्त व्याख्यान व सत्कार कार्यक्रम संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
नांदेड-प्रतिनिधी
जीवनसाधना फाऊंडेशनच्या वतीने दि.३१ डिसेंबर २०२३ रविवार रोजी सकाळी ११-३० वाजता पूज्य साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. प्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले.”साने गुरुजींच्या साहित्यातून होणारे बालसंस्कार” या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते,समुपदेशक एस.एम.कदम (सुखानंद) यांनी व्याख्यान दिले. यावेळी शिक्षण,पत्रकारीता,गायन,समाजसेवा,समुपदेशन,ग्रामविकास,बालक व महिला सक्षमीकरण यांसारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विभागीय, राज्यस्तरीय,राष्ट्रीय व जीवनकार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गायन,वादन,नृत्य,क्रीडा,वक्तृत्वकला,चित्रकलेत पारंगत असणाऱ्या प्रतिभावान बालकांचा जाणीव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम चैतन्यनगर रोड भागातील मदर तेरेसा नर्सिंग स्कुलच्या सभागृहात घेण्यात आला.अध्यक्षस्थानी डॉ.सचिन कदम रोडगेकर होते.
पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले त्यांचे नाव,क्षेत्र व गावाचे नाव खालील प्रमाणे:
चेतक मानवता व एकात्मता विभागीय पुरस्कार-
माधव पटने (पत्रकारीता, बिलोली), डॉ.संगीता घुगे(शिक्षण,नांदेड),लक्ष्मण कावळे ( शिक्षण,परभणी), सौ.रेखा मनाठकर ( गायन,पुणे), सौ.सुनीता चौहान (महिला व बालक सक्षमीकरण,नांदेड)
नेताजी सुभाषचंद्र बोस मानवता व एकात्मता विभागीय पुरस्कार –
डॉ.भारत शिंदे ( शिक्षण,पालम), दत्ता सुरवसे ( पत्रकारीता,बार्शी), ज्योती करजगीकर ( शिक्षण, वसमत), पुष्पा सूर्यवंशी ( समुपदेशन,नांदेड), शेख मोहसीन ( पत्रकारीता, सेलू,परभणी)
चेतक मानवता व एकात्मता राज्यस्तरीय पुरस्कार –
नरेशसिंह ठाकूर ( समाजसेवा,सोलापूर), सौ.सीमा सत्यनारायण बोखारे ( ग्रामविकास,पांग्रा बोखारे )
नेताजी सुभाषचंद्र बोस मानवता व एकात्मता राज्यस्तरीय पुरस्कार –
प्रा.डॉ.रामकृष्ण बदने ( संशोधन मार्गदर्शक- गाईड, मुखेड),
नेताजी सुभाषचंद्र बोस मानवता व एकात्मता राष्ट्रीय पुरस्कार –
प्रा.सागर पाटील ( शिक्षण व समाजसेवा,मंगळवेढा जि.सोलापूर), प्रा.विकास शिंदे ( आदर्श शिक्षक,वडाळा- सोलापूर), डॉ.महादेव डिसले ( उत्कृष्ट शिक्षक/प्राध्यापक व रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी,बार्शी)
चेतक मानवता व एकात्मता जीवन कार्यगौरव पुरस्कार –
प्रा.एल.एल.शिंदे ( शिक्षण- इंग्रजी,हिंगोली) यांना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकारी तथा रोटरी क्लब,इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ.पुष्पा गायकवाड, शिवा लोट,डॉ.सचिन कदम रोडगेकर यांनी भाषण केले.पुरस्काराचे मानकरी असलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन माधव पटने यांनी केले.
या कार्यक्रमाला डॉ.पुष्पा गायकवाड, प्राचार्य डॉ.यादव गायकवाड,शिवा लोट, डॉ.सचिन कदम रोडगेकर यांच्यासह भास्कर शास्त्री,लक्ष्मण पाटील,पियुष शिंदे,सौ.मानसी ठाकूर,रुख्मिणी महादेव पाटील,शिवानी ठाकूर, वीणा कदम यांच्यासह परिसरातील युवक,युवती, महिला, पुरुषउपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!