डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी प्रतिनिधी.

कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त बुद्धिबळ स्पर्धा संत तुकाराम हॉल बार्शी या ठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेचे आयोजक वखारिया विद्यालय उपळे (दु) हे होते.या स्पर्धा खुला प्राथमिक व खुला माध्यमिक गट तसेच खुला गट मुले व खुला गट मुली अशा चार गटात घेण्यात आल्या होत्या. यातील प्राथमिक गट व माध्यमिक गटाच्या स्पर्धा दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाल्या. तसेच मुलांचा खुला गट व मुलींचा खुला गटाच्या स्पर्धा दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाल्या.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून संस्थेचे ट्रस्टी व माजी प्राचार्य डॉ सी एस मोरे उपस्थित होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेची सुरुवात संस्थेचे ट्रस्टी व माजी प्राचार्य डॉ सी एस मोरे यांनी बुद्धिबळ पटावरील एक सोंगटी खेळून केली.याप्रसंगी संस्थेचे सदस्य व स्पर्धा प्रमुख बी.के.भालके. मुख्याध्यापक दयानंद रेवडकर,नामदेव महाले,अतुल नलगे,स्नेहा निंबाळकर व अविनाश जाधव,सागर मोरे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये सर्व गटातून ४०३ स्पर्धकांनी भाग घेतला होता.प्राथमिक व माध्यमिक गटातून पाच क्रमांक काढण्यात आले.
यामध्ये खुला प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक ध्रुवा दिनेश पाटील(सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम बार्शी) द्वितीय क्रमांक सान्वी दत्तात्रय गोरे (महाराष्ट्र विद्यालय बार्शी) तृतीय क्रमांक अनन्या चंद्रकांत उलभगत (फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी), चौथा क्रमांक युवराज भगवंत बोबडे (सुलाखे इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी) व पाचवा क्रमांक सिद्धांत सागर कोठारी (फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी)
खुला माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक कावरे हरीश उत्तम(महाराष्ट्र विद्यालय बार्शी),द्वितीय क्रमांक प्रसन्न विदयाधर जगदाळे (महाराष्ट्र विद्यालय बार्शी), तृतीय क्रमांक विराज पांडुरंग कांबळे (सुलाखे हायस्कूल बार्शी) चौथा क्रमांक यशवंत राजेंद्र उबाळे(सुयेश विद्यालय बार्शी) पाचवा क्रमांक जाधव यज्ञेश महारुद्र(महाराष्ट्र विद्यालय बार्शी)
खुला गट मुले प्रथम क्रमांक ध्रुवा दिनेश पाटील (सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी )द्वितीय क्रमांक शंकर दत्तात्रेय साळुंखे ,तृतीय क्रमांक शार्दुल रामचंद्र राखुंडे
खुला गट मुली प्रथम क्रमांक सान्वी दत्तात्रय गोरे (महाराष्ट्र विद्यालय बार्शी) द्वितीय क्रमांक संपदा समाधान बोळे (न्यू हायस्कूल बार्शी),अक्षरा सोमेश्वर देशमाने(फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी),
दिनांक ३१ डिसेंबर २०२३ रोजी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्पर्धा प्रमुख बी.के भालके व संयोजन समिती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक दयानंद रेवडकर,अतुल नलगे,नामदेव महाले,स्नेहा निंबाळकर, अविनाश जाधव व सागर मोरे यांनी परिश्रम घेतले तसेच पंच म्हणून काम पाहिले.
या यशाबद्दल दोन्ही खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन.जगदाळे,सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य,सर्व संस्था सदस्य, स्पर्धा प्रमुख बी.के.भालके,वखारिया विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्या के.डी.धावणे,उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक एस.सी.महामुनी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!