स्टार माझा न्यूज :- परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा (दिं 15)
परंडा येथे जागतिक दिव्या दिन तीन डिसेंबर निमित्त दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने दिव्यांग सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न झाला
या कार्यक्रमांमध्ये दिव्यांगांच्या विविध योजना दिव्यांगांच्या समस्या दिव्यांचे तारांकित प्रश्न इत्यादी विषयावर चर्चा करण्यात आली व प्रश्न सोडवण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह नेहमी कटिबद्ध राहील असे आश्वासन दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांनी दिले या कार्यक्रमात उपस्थित तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर यावेळी बोलताना म्हणाले की दिव्यांगाची सेवा हीच ईश्वरसेवा याप्रमाणे काम करावे व दिव्यांगणा न्याय मिळवून द्यावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत या कार्यक्रमाला उपस्थित ह भ प बालाजी महाराज बोराटे वर्षद तात्या शिंदे प्रहार जिल्हाध्यक्ष धाराशिव विठ्ठल गायकवाड भाजपा दिव्यांग उपाध्यक्ष ,गोरख मोरजकर अध्यक्ष मराठा सेवा संघ, परांडा आप्पासाहेब तरटे प्रहार तालुका अध्यक्ष प्राणजित भाऊ गवंडी छत्रपती शासन ग्रुप अध्यक्ष औदुंबर ठोंगे सतीश पवार तानाजी सांगडे दिव्यांग शहराध्यक्ष गोरख देशमाने माजी सरपंच रावसाहेब खरसडे या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग सन्मान सोहळ्यामध्ये दत्तात्रय ठोंबरे , गोरख देशमाने, गणेश जाधव, सतीश पवार, सखुबाई गायकवाड, संतोष कुलकर्णी ,भारत झोंबाडे ,राहुल देशमुख इत्यादींना दिव्यांग सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व दिव्यांगांचा गुलाब देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थित दिव्यांग सावंत, मधुकर मोटे, गणेश जाधव , हेळकर, आदी दिव्याग बांधव उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.