आनखी २ महिलांचा मृत्यू तळवडे आग दुर्घटनेतील मृतांची संख्या ११ झाली आहे.

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.१४ तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत जखमी रुग्ण प्रियंका यादव वय ३२ यांचे रात्री पावणे दोन वाजता तर अपेक्षा तोरणे वय १८ यांचे सकाळी साडेसहा वाजता सुसून रुग्णालयांमध्ये उपचारात दरम्यान आज निधन झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील वृत्तांची संख्या ११ झाली आहे. तळवडे येथील एका कारखान्यांमध्ये ८डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने पुणे येथील सुसून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतीक्षा तोरणे वय १६ वर्षे आणि कविता राठोड वय ४५ वर्षे यांचे ९ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड वय ३१ वर्ष यांचे १० डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर, उर्वरित जखमींपैकी आज दोन जणांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यामुळे तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मूर्तींची संख्या ११ झाली आहे. या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, सुमन गोंधळे, कोमल चोरे, रेणुका ताथोड, आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत या रुग्णांच्या प्रकृती विषयी आयुक्त शेखर सिंह विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच ते वेळोवेळी या रुग्णांच्या प्रकृती बद्दल माहिती घेत आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयांमध्ये मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि मदतनीस यांची २४ तास सेवा करण्यात आलेली आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!