विद्यार्थ्यांनी मैदानी खेळावर लक्ष द्यावे – हरभजन सिंग.

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि११ विद्यार्थ्यांनी मैदानी खेळावर भर द्यावे मैदानी व बौद्धिक खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनी मुलांना मोबाईल पासून दूर ठेवावे. खेळाडूचा स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी घेतलेले कठोर परिश्रम खेळाडूला यशाच्या जवळ घेऊन जातात असे मत भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यांनी व्यक्त केले आहे. चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित १० दिवसीय स्पोर्ट फेस्टिवलच्या निमित्ताने बक्षीस वितरण समारंभास भारताचा माजी क्रिकेट गोलंदाज हरभजन सिंग यांनी प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद संस्थांना तो बोलत होता. हरभजन म्हणाला एल प्रो स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि जल्लोष पाहून मन भारावले मुलांनी स्वतः ठरवावे की त्यांना खेळाडू व्हायचे आहे की नाही कारण मनात नसेल तर रट्टा मारून एक वेळा अभ्यास करता येतो पण इच्छाशक्ती असल्याशिवाय खेळाडू बनणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या आवडीचा खेळ खेळा जो खेळ निवडला त्या खेळात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करा इतरांपेक्षा अधिक मेहनत करा यश नक्की प्राप्त होईल असे विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी जिद्द व सचोटी बाळगावी त्याने यशापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा मिळेल तसेच सर्वांनी शरीर दृष्ट्या फिट राहण्याचा प्रयत्न करावा अशी हरभजन महाला. भारतीय संघाबद्दल बोलताना तो म्हणाला विश्वचषक हरल्याने सर्वांचेच मन तुटले आहेत. पण भारतीय संघ हा अत्यंत मजबूत संघ आहे. त्यातील खेळाडू हे प्रतिभावंत खेळाडू आहेत पराभवातून ते नक्कीच नवीन काहीतरी शिकतील असे तो म्हणाला. येत्या टी.२० विश्व चषकाबाबत बोलताना मनाला भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाने रोहित आणि विराट यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यायला हवा कारण ते दोघेही वरिष्ठ खेळाडू आहेत. रोहित मध्ये संघाचे नेतृत्व करण्याचे आणखी कौशल्य आहे. त्या दोघांनीही ही टी २० चषक स्पर्धा खेळावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!