तळवडेतील वाहतूक समस्या न सोडवल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:-दि १२ तळवडे चौकात शनिवारी दि ९ रोजी दुपारी २ वाजता वृषाली बाजीराव भालेकर यांचा अपघाती मृत्यू झाला.ही घटना वाहतूक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे घडली आहे.त्यामुळे तळवडे ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. पोलिस आयुक्तांना तळवडेतील समस्या १५ दिवसांत न सोडविल्यास तळवडे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तळवडेतील ग्रामस्थांनी केला आहे.
तळवडे ग्रामस्थांच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, भालेकर यांचा अपघात झाला त्या दिवशी आळंदी यात्रा होती. त्यावेळी तळवडे चौकात एकही वाहतूक नियंत्रक पोलिस उपस्थित नव्हता,या घटनेनंतर देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गजेवार आले. त्यांनी संबंधित मयताचे नातेवाईक व ग्रामस्थ महिलांना धमकावले. तसेच तुमच्यावर गुन्हे दाखल करू व करिअर बर्बाद करू आणि उपस्थित महिलांसोबत असभ्य भाषेत वर्तन केले. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित पोलिस कॉन्स्टेबल गजेवार यांची त्वरित बदली करावी. तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी व अधिकारी कोणीही हजार नव्हते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तळवडे कॅनबे चौक ते त्रिवेणीनगर या रोडवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते.त्यामुळे या मार्गावर सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालावी. अन्यथा तळवडे हद्दीतील चाकण एम आय डी सीला जाणारा ब्रिज बंद करण्यात येईल.निगडी तळवडे मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा.तळवडे चौक, त्रिवेणीनगर चौक येथे नियमित वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस नियुक्त करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पोलस आयुक्तांना निवेदन देताना केली आहे. यावेळी माजी नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, माजी नगरसेविका संगीता ताम्हाणे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र सोनवणे, शरद भालेकर, विनायक पिंजण,शरद गोपाळ भालेकर, अशोक भालेकर, रमेश बाठे, भरत कामठे, बाळासाहेब नखाते व ग्रामस्थ उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!