स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी दि.१२ रोजी नेटके फार्महाऊस भोंजा हवेली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा येथील शालेय शिक्षक व विद्यार्थी यांनी बायोगॅस निर्मिती संयंत्रास भेट दिली या वेळी शालेय शिक्षण समिती चे उपाध्यक्ष/ शेतकरी अमोल नेटके यांनी आपल्या पशु/जनावरांच्या शेणापासून गॅस उपलब्ध होत असुन या बायोगॅसमुळे चांगला वापरत आहेत. तसेच यावेळी शालेय विज्ञान शिक्षक सोमनाथ पवार यांनी विद्यार्थ्यांना माहिती देताना यामध्ये ऑक्सीजन शिवाय अपघटन होऊन मिथेन व कार्बन डायऑकसाइड वायू तयार होतो मिथेन हा वायू ज्वलनशील आहे याचा वापर इंधन म्हणून केला जातो तसेच विद्युत रक्षक तडीत यंत्र व सोलर ऊर्जा यंत्राची ही माहिती दिली यावेळी मुख्याध्यापक कवी श्री बाबासाहेब घोगरे सोबत विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात नेटके फार्महाऊस येथे वनभोजनाचा आनंद घेतला.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.