परंडा सेवा मंडळाच्या सौज्यन्याने विद्यार्थी – विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा (9) येथील परंडा सेवा मंडळाच्या वतीने जि. प. शाळेत परंडा उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने विद्यार्थी -विद्यार्थिनींची
आरोग्य तपासणी पार पाडली. 104 विद्यार्थी आणि 40 विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी
केली. प्रत्येकाचा रक्तदाब तपासला आवश्यकतेनुसार औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रारंभी स्थानिक नियोजन समितीचे कार्यवाह मधु लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.
छत्रपती संभाजीनगरहून या कार्यक्रमास उपस्थित असलेले डॉ. आनंद पाटील (एम. डि. पॅथॉलॉजी) यांनी परंडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विश्वेश कुलकर्णी यांचेसह त्यांच्या सहकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री सुरेशसिंह (दादा )सद्दीवाल यांचेही स्वागत केले. याप्रसंगी डॉ आनंद पाटील(सचिव), डॉ विश्वेश कुलकर्णी, मुख्याध्यापक इंगळेसर, अमोल वांबुरकर आदींनी आरोग्य विषयक मार्ग- दर्शन केले.
वैद्यकीय अधिक्षक डॉ विश्वेश कुलकर्णी (बालरोग तज्ञ), डॉ दयानंद पाटील, डॉ श्रीमती.कोरबू, श्रीमती.गायकवाड ,श्रीमती.शिंदेश्री.गुंजाळ, श्री अमोल वांबुरकर ,यांचेसह डॉ आनंद पाटील यांनी आरोग्य तपासणीत सहभाग नोंदविला.जि. प. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री इंगळेसर, मुख्याध्यापक श्री. पवार सर यांचेसह सर्वश्री.पखाले,खरात,शिंदे,-माने, मिसाळ, सुर्यवंशी,माळी,श्रीमती.हुकीरे, श्रीमती.देशमुख,श्री.सुरवसे,श्रीमती.जगताप यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले, मंडळाचे क्रियाशील सदस्य श्री.विशाल काशीद यांनी सर्वांचे आभार मानून – कार्यक्रमाची सांगता केली.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!