अग्निकांडाला जबाबदार अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा- तुषार कामठे

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि.९ तळवडे येथील अग्निकांडाला जबाबदार अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केली आहे.तुषार कामठे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त निवेदन दिले आहे.तळवडे येथे विनापरवाना अनाधिकृत असे फटाक्यांची फॅक्टरी चालवली जात होती. सदर फॅक्टरीमध्ये केकवर लावण्यात येणारे आतिषबाजी करणारे कॅण्डल बनवण्याचा उद्योग राजरोस पणे चालू होता. आज या फॅक्टरीमध्ये भीषण आग लागली. मध्ये होरपळून सहा कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. तसेच बरेच जण गंभीर भाजले आहेत गेले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव स्मृती रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने बऱ्याच ठिकाणी अशा अनधिकृत कंपन्या चालल्या जातात. अग्निशामक विभागातर्फे देखील कोणाचेही या गोष्टीवर नियंत्रण नाही छोटे छोटे फटका व्यवसाय रस्त्यावर फटाका विकताना ज्या परवानगीत काढल्या जातात त्यामध्ये प्रचंड अशी मानसिक आणि आर्थिक पिळवणूक त्या गोरगरीब होतकरू तरुणांची होत असते. परंतु, अशा प्रकारे अनाधिकृत फटाक्याच्या कारखान्यावर कोणती कारवाई प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत यासंदर्भात तुषार कामठे यांनी महापालिका चे आयुक्त शेखर सिंह तसेच पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे यांना चौकशी करण्यासंदर्भात पत्र दिले आहे. पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणाचे लवकरात लवकर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. जेणेकरून शहरांमध्ये पुन्हा अशा घटना घडणार नाहीत असे तुषार कामठे यांनी म्हटले आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!