स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि ८ पिंपरी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज महाराष्ट्रभर विविध प्रकारे आंदोलन करत आहे. मराठा समाजास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले देणे मराठा समाजास कुणबी दाखले देऊन सरसकट ओबीसी प्रवाहातून ५० टक्के च्या आत आरक्षण देणे यासाठी महाराष्ट्र सरकारने २४ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदत मागून घेतली आहे. परंतु महिनाभर सरकार याबाबत जलद गतीने काम करताना दिसत नाही. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न मुदतीत सोडवावा यासाठी म्हणून जरांगे पाटील यांच्या आवाहनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरुवात करण्यात आले .यावेळी सतीश काळे, वैभव जाधव, मीरा कदम, लहू लांडगे, संपत पाचुंदकर, प्रकाश बाबर, सुनिता शिंदे, माणिक शिंदे, शितल घरत, रावसाहेब गंगाधर, यांनी उपोषण केली. सदर आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मारुती भापकर, कामगार नेते काशिनाथ नकाते, काशिनाथ जगताप, प्रकाश जाधव ,किशोर मोरे, जीवन बोराडे, ब्रह्मानंद जाधव, अरविंद जगताप, युवराज दामले ,संपत जगताप, गोविंद खामकर या प्रमुख मान्यवरासह आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रत्येक समाजास न्याय मिळावा प्रत्येक समाजास लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासाठी जातीनिहाय जनगणना करावी वेळ पडल्यास केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाने घटना दुरुस्ती करून मराठा समाजास न्याय द्यावा. अशी मागणी सुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तसेच उपस्थित त्यांनी यावेळी केली आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.