भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची महापालिका आयुक्तांना सुचना; शहरातील विकास कामांसाठी कालबद्ध नियोजनाची गरज.

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-दि ८ पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पायाभूत सोयी सुविधा देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा ज्याद्वारे विकास कामांना गती देता येईल शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिकेतून प्रकल्प मार्गे लावावेत अशी सूचना भाजपा शहर अध्यक्ष शंकर जगताप यांनी केली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या समावेत भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी नवी सांगवी परिसरातील विविध प्रस्ताविक विकास कामाचे पाहणी केली .पाहणी दौऱ्या दरम्यान सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव आदी ठिकाणच्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी माजी महापौर माई ढोरे, माझी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक सागर अंघोळेकर, हर्षल ढोरे, उषा मुंडे, अमरनाथ कांबळे, संतोष कांबळे, शारदा सोनवणे, श्री गणेश सहकारी बँकेचे संचालक संजय जगताप, माजी सिनेट सदस्य संतोष ढोरे, भाजपा शहर चिटणीस हिरेन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते जवाहर ढोरे, यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सांगवी येथील संगमनगर ममता नगर मार्गे बोपोडी औंध कडे जाणाऱ्या पुलाच्या संदर्भात चर्चा झाली. या पुलाच्या बाबतीत कृषी विभागाच्या काही तांत्रिक अडचणी असून त्या लवकरच मार्गी लावण्यात येतील तसेच मधुबन सोसायटी गल्ली नंबर १ ते ९ येथील १२ मीटरचा रस्ता नवी सांगवी येथील कृष्णा चौक ते वीस मीटरच्या रस्त्या संदर्भात तसेच रामनगर, यमुना नगर सोसायटी मयूर नगरच्या शेजारच्या रस्त्याच्या कामाला गती देण्याबाबत ही चर्चा करण्यात आली.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!