पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-दि ८ तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला ही घटना आज दुपारी २:४५ वाजता घडली असून ही कंपनी वाढदिवसाला केकवर लावण्यात येणाऱ्या फायर कक्रर कंपनी होती. यामध्ये सहा महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आहेत. तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आत- बाहेर जाण्यासाठी एकच शटर असल्याने या महिला कंपनीत अडकल्या स्फोटाच्या आवाजाने हा शटर बंद झाला. आणि कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला काही महिला अजून जखमी आहेत. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी येण्यापूर्वी नागरिकांनी जखमींना रुग्णालयात हलवले होते. घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घटनास्थळी भेट दिली घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु असून जखमींना रुग्णालयात हलवले आहे. मृत्यू झालेले सर्व कामगार हे केकवरील वरील फायर कँडल बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.