www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी प्रतिनिधी, दिनांक ७/१२/२०२३. मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समावेश व्हावा या मागणी करता बार्शी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन यावेळी बोलताना आनंद काशीद चालू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेशश व्हावा व मराठा समाजाचा असणारा पिढ्या-पिढ्याचा आरक्षणाचा वनवास संपवावा मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे त्याचा अंत सरकारने बघू नये मराठा समाजाला या राज्यामध्ये शांतता हवी आहे म्हणून मराठा समाज लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहे.
लवकरात लवकर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सरकारने मिटवावा आज मराठा समाज अर्ज नवीन आंदोलन करू लागलेला आहे जर आरक्षणाचा प्रश्न नाही मिटवला तर येणाऱ्या काळामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या पुढार्यांचे राजकीय भुरके फाडून त्यांना नग्न केल्याशिवाय मराठा समाज शांत राहणार नाही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मिळवा ही विनंती मराठा समाज हात जोडून करत आहे त्यामुळे चालू असणारा अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा असे यावेळी आनंद काशीद यांनी आपलं मत व्यक्त केलं मागील 38 दिवसापासून सकाळी उपोषण बार्शी तहसील कार्यालयासमोरमोर चालू आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलनोलन चालूच राहील असे आनंद काशीद यांनी सांगितले.या आंदोलनासाठी पांडुरंग घोलप ,बालाजी डोईफोडे, अंकुश भिसे, विकास माने, संजीवनी ताई बारंगूळे, कल्याण घळके यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.