सुलभा उबाळे यांनी शिवसेनेची ध्येयधोरणे घरोघरी पोहचविण्यासाठी केल महिलांना सज्ज

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- कोणा काळामध्ये तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जबाबदार कुटुंबप्रमुख या नात्याने जनतेची सेवा केली. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना शिवसेनेत बरोबर घेऊन मोठी पदे दिले. परंतु काहींनी शिवसेनेला अडचणीत आणून स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षात फूट पाडले. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वाढविणे आणि पक्षाची ध्येय धोरणे घरोघरी पोहोचवण्यासाठी महिला सज्ज झाले आहेत. असे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे म्हणाल्या शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड शहर महिला आघाडी पदाधिकारी यांचा नियुक्तीपत्र वाटप समारंभ सेना भवन आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे शहर संपर्कप्रमुख सचिन आहेर तसेच महिला आघाडी मावळ पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख लतिका पाष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी सुलभा उबाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाप्रमुख शैला खंडागळे, शहर संघटिका अनिता तुतारे, शहर प्रमुख एडवोकेट सचिन भोसले, युवराज कोकाटे, माजी नगरसेविका रेखा दशिले, नितीन बोंडे, आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड भोसरी मधील अनेक महिलांनी पक्षप्रवेश केला आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!