स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा : शहरात जागतिक एड्स दिनानिमित्त आता नेतृत्व व आघाडी समुदायांची या घोषवाक्यास अनुसरून उप जिल्हा रुग्णालय वैदयकिय अधिक्षक डॉ विश्वेश कुलकर्णी ,शिवाजी महाविद्यालय संस्थापक अध्यक्ष श्री मोरजकर सर , शिवाजी महाविद्यालय सचिव श्रीमती आशा मोरजकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी उद्धव कदम व जिल्हा पर्यवेक्षक महादेव शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स दिनानिमित्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी शिवाजी महाविद्यालय प्राचार्य श्री टी. एन लोखंडे व वैदयकिय अधिकारी डॉ. अबरार पठाण यांनी हिरवा झेंडा दाखवुन प्रभातफेरी ची सुरवात केली . यावेळी रुग्णालयतील वैदयकिय अधिकारी डॉ आनंद मोरे, समुपदेशक मकरंद वांबुरकर श्री रविन्द्र करपे, तसेच तानाजी गुंजाळ, विक्रम वाघ, दतात्रय आडसुळ, भुजल सर्वेक्षण प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री . रमेश मगर किशोर जगताप, अनिल भोसले, अमर पठाण, मिलीद बनसोडे, वाहन चालक तुषार गायकवाड यांनी सहकार्य केले तसेच महाविद्यालयातील प्रा. जोगी मॅडम, प्रा.बोकेफोडे मॅडम, प्रा.सय्यद मॅडम, हन्नुरे मॅडम, प्रा. पाटील सर. हे प्रभात फेरीत उपस्थित होते.शहरातील प्रमुख मार्गावरून प्रभात फेरी उपजिल्हा रुग्णालय येथे आल्यानंतर वैदयकिय अधिकारी डॉ आनंद मोरे यांनी जिवनाची पंचसुत्री सांगीतली आचार विचार आणि विहार आचरण या बदल विद्यार्थीना मार्गदर्शन केले. सर्वांचे आभार माणुन प्रभातफेरी चा समारोप करण्यात आला.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.