मराठी भाषेत पाट्या न लावणाऱ्या दुकानावर कडक कार्यवाही करा – मनसे.

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड मनसेने मराठी पाठ्य न लावलेल्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडे पत्रद्वारे केली आहे. असे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी त्यांच्या पद अधिकार्‍यासह पिंपरी चिंचवड पोलिसांना पत्र दिले सर्व दुकाने, हॉटेल व इतर आस्थापना यांनी दुकानावर मराठी भाषेत पाठ्या लावणे बंधनकारक असून त्या पाट्या लावण्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सर्वांना दोन महिन्याची मुदत दिली होती. ती मुदत २५ नोव्हेंबर २०२४ रोजी संपली आहे. यापूर्वी मराठी भाषेत पाट्या लावण्याविरोधात काही व्यापाऱ्यांनी, संघटनांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली व दोन महिन्यात सर्व दुकानावर ठळकपणे मराठी भाषेत पाट्या लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. असे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील अनेक दुकानांवर अजूनही मराठी भाषेत पाट्या लावलेल्या दिसून येत नाहीत. शहरातील सर्व दुकाने हॉटेल आस्थापनांना सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळणे अपेक्षित असताना बऱ्याच ठिकाणी त्यांची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. तरी निवेदनाद्वारे विनंती करण्यात येत आहे. की, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपल्या आठही क्षेत्रीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व दुकाने, हॉटेल आस्थापनांना यांना त्वरित मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबतचे निर्देश देऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यात यावे. त्यावेळी जर काही तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यास याची आपण गंभीर नोंद घ्यावी मुंबई महानगरपालिकेने २५ नोव्हेंबर २०२४ नंतर मराठी भाषेत पाट्या लावल्या नसतील तर या दुकानांना कोणतेही नोटीस न देता थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. आपण यावरील विषयाचे गांभीर्य ओळखून योग्य ती कारवाई कराल व पुढील होणारे आंदोलन टाळाल अशी अपेक्षा मनसेने बाळगली आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!