तीन राज्यातील भाजपाच्या विजयचा पिंपरी चिंचवडमध्ये आनंदोत्सव साजरा

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- पिंपरी देशवासीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास आणि केलेल्या विकास हेच भाजपाच्या विजयाचे सूत्र आहे. मोदीवर सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये दमदार विजय मिळवून दिला आहे .आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपाचे ४५ हून अधिक खासदार आणि देशातील ३५० हून अधिक खासदार निवडून देतील विजयाची ही मालिका कायम राहील असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेली निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपाचे दमदार कामगिरी करत बहुमत मिळवले आहे. यानिमित्त पिंपरी चिंचवड भाजपा तर्फे मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष जगताप बोलत होते. यावेळी भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष व पर्वक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास बडगिरी, संजय मोगोडेकर, अजय पाथर्डी, नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अमित घोडके, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, प्रदेश सचिव कविता हिंगे, उपाध्यक्ष आशा काळे, सचिव राजश्री रायभाई, अभिजीत बोरसे, समीर जावळकर, उपाध्यक्ष बिबीशन चौधरी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस धनराज बिरदा, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडे, माजी नगरसेवक सागर अंघोळकर ,शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, गोपाळ मंडल, जयेश चौधरी, सुधीर साळुंखे प्रसाद कस्पटे विना सोनवलकर ,दीपक भंडारे, राजेश गुंजाळ खेमराज काळे, गणेश ढाकणे, चैतन्य देशपांडे, माजी नगरसेविका अश्विनी बोबडे, सदस्य सुनिता खराडे, प्रज्ञा हितनाळेकर, सीमा चव्हाण, संतोष भालेकर, आदी उपस्थित होते. शंकर जगताप म्हणाले की आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. विरोधकांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवताना भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान केले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी देखील वाढली होती. यामुळे अनेक भाजपाच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे. जनतेचा हा कौल मोदीच्या बाजूने आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!