पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड :- पिंपरी राज्यभरासह देशभरात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज बांधवांनी आंदोलनाचे रान उठवले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सध्या जोरदार आंदोलने होत आहेत. दोन टप्प्यात आंदोलने पार पडली आहेत. या आंदोलनात पिंपरी चिंचवड शहरातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी देखील सहभाग नोंदवला आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनासाठी मराठा आरक्षणाच्या लढ्याला पिंपरीतून ताकद उभारणार असा निर्धार मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते सतीश काळे यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला पिंपरी चिंचवड मध्ये सुरुवात होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील विविध सामाजिक संघटनाशी बैठका आयोजित करून या आंदोलनासाठी ताकद उभा करण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच पुढील दिशा ठरवली जात आहे. मराठा आरक्षणाच्या राज्यसरकार,केंद्र सरकार पळवटा काढत आहे. आरक्षणाअभावी समाजावर अनेक संकटे येत आहेत. शिक्षण, रोजगार, उपलब्ध होत नाही यामध्ये आरक्षणाद्वारे संधी मिळेल अशी भूमिका समाजाचे आहे. त्यासाठी शासनाने लवकर निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र, वेळ काढू भूमिकेमुळे समाजावर अन्याय होताना दिसत आहे. परिणामी मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्याचे आंदोलनात रूपांतर होत आहे. विविध क्षेत्रातील तज्ञ यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे त्यांच्याशी बैठकांचे सत्र सुरू असून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येत आहे. असे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी म्हटले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.