रा गे शिंदे महाविद्यालयात विद्यापीठ पदवी परीक्षा सुरळीत सुरू.

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे
परांडा दि . 29 नोव्हेंबर 2023 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अंतर्गत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर अंतर्गत पदवी परीक्षा दि . 21 नोव्हेंबर २०२३पासून सुरू झालेल्या आहेत . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे .
या परीक्षेचे परीक्षा केंद्रप्रमुख म्हणून प्रा डॉ रंदील गजेंद्र हे काम पाहत आहेत . तर या परीक्षेसाठी सह केंद्रप्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथील प्रा डॉ शफिक लतीफ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .या परीक्षेसाठी कस्टोडियन म्हणून अजित घुमरे तांत्रिक सहाय्यक अनिल जानराव तर सेवक म्हणून उत्तम माने भागवत दडमल हनुमंत मार्तंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .परीक्षा कालावधीमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाला परीक्षा संदर्भात पत्र देऊन पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे .परीक्षा दोन सत्रामध्ये मध्ये सुरू असून या परीक्षेसाठी बीए बीकॉम बीएससी बीसीएस आणि बीएससी संगणक शास्त्र इत्यादी शाखेच्या विद्यार्थ्यां परीक्षा देत आहेत . परीक्षा सुरळीतपणे सुरू आहेत .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!