पर्व ८ च्या सई तापकीर ठरल्या महाराष्ट्राची सौंदर्यवती

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- पिंपरी महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पिंपरी चिंचवड शहरातील लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने करण्यात येते. या संस्थेच्या वतीने महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२४ पर्व ८अंतर्गत महिलांच्या खुल्या गटाच्या आणि लहान मुले आणि मुलींच्या सौंदर्य स्पर्धा रविवारी चिंचवड येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सौंदर्यवतीने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत झालेल्या विविध फेऱ्यामध्ये सई तापकीर या प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्राचे सौंदर्यवती स्पर्धा २०२३ चा मुकुट आणि रोख पंधरा हजार रुपयांचे बक्षिसाच्या मानकरी ठरल्या.

नेहा निकाळजे द्वितीय क्रमांक मुकुट आणि रोग बारा हजार रुपये, तृतीय क्रमांक सानिका जवंजाळ यांनी मुकुट रोग दहा हजार रुपये बक्षीस पटकावले. विजेत्या स्पर्धकांना ज्येष्ठ कर सल्लागार शालिग्राम तायडे प्राध्यापक विजय रामने यांच्या हातसे सोन्याची नथ पैठणी आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. लहान मुलाच्या गटात प्रथम क्रमांक अंसिका कदम, द्वितीय क्रमांक अनविका मोरे विकास मोरे, आणि तृतीय क्रमांक अनिकेत साळुंखे यांनी मिळवला. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. नयना वेदपाठक, डॉक्टर दुर्गा लकडे, सुहास ढवळे आणि प्राध्यापक सुमिता काटकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर, ग्रोमिंग नरेश फुलेलू, क्षितिज गायकवाड आणि इशा राजे यांनी केली. आऊटफिट तृप्ती पवार, वेशभूषा केशरचना रिया आदमाने, आणि प्रिया कानडे यांनी केली. शिल्पा मगरे, निकिता गायकवाड आणि प्रीती वाघमारे यांनी संयोजनात सहभाग घेतला स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंटचे संचालक संजीवन जोक, सूत्रसंचालन रुचिका भोंडवे, आभार कावेरी तांबे यांनी मानले

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!