पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:-दि.१० नोव्हेंबर २०२३ पुण्यातल्या पुलगाव मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल हाती आला आहे. गत विजेत्या शिवराज राक्षेला आसमान दाखवत सिकंदर शेकने महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार जिंकला आहे. मानाची गदा उंचावर त्याने उपस्थित त्यांना अभिवादन केलं आणि आपला विजय साजरा केला. सिकंदर शेख ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी ही महत्त्वाची होती. या फेरीत सिकंदरचे पारडे जड होते मात्र शिवराज राक्षे त्याला आव्हान देईल असेही अनेकांना वाटत होतं मात्र वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर शेख पुढे शिवराज राक्षेचा निभाव लागला नाही. लढत सुरू झाल्यानंतर ५.३७ व्या सेकंदाला झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि अवघ्या 12ते15 सेकंदात चितपट करून विजय मिळवला. माती विभागातून संदीप मोटेचा पराभव करून सिकंदर शेखनेअंतिम फेरी गाठली होती. तर गादी विभागातून हर्षद कोकाटे ला पराभवाची धूळ चारत शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडकला होता. या दोघांमधील लढत अत्यंत चुरशीशी झाली. या लढतीत शिवराज राक्षेचा पराभव करत सिकंदर शेखने मैदान मारलं. आणि महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं.
काय म्हणाला महाराष्ट्र केसरी पै सिकंदर शेख.आता देशासाठी मेडल आणायचे आहे.- सिकंदर शेख सिकंदर शेख आणि गत विजेता शिवराज राक्षे यांच्यात चुरशीचा सामना झाला. अवघ्या काही क्षणांमध्ये सिकंदरने शिवराज रक्षेला आसमान दाखवलं. आणि महाराष्ट्र केसरीची मानाची गदा तसेच महिंद्रा थार ही गाडी मिळवली. माझ्या विजयाचे श्रेय माझे वडील आणि माझे कोच यांना जातं मी मागचे सहा ते सात महिने कसुन सराव केला मला आता देशासाठी मेडल आणण्याची इच्छा आहे. असं सिकंदर शेखने म्हटलं आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.