मराठा आरक्षणाची धग तीव्र,
परंडा – ४७ गावात मंत्री आमदार खासदार यांना प्रवेश बंदी

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
मोटारसायकल रॅली काढून ; तहसिलदार यांना निवेदन

आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाचं ; जय जिजाऊ जय शिवराय घोषणांनी
परिसर दुमदुमला

परंडा : मराठा आरक्षणाची धग तीव्रतेने वाढत असून परंडा तालुक्यातील ९६ गावांपैकी ४७ गावांनी मंत्री , आमदार , खासदार यांना गाव बंदी केलेली आहे .बुधवार ( दि.२५ ) शेळगाव ,
धोञी ,आनाळा ,रुई , दुधी ,मुगाव ,खानापुर , जामगाव ,तांदूळवाडी ,कार्ला , चिंचपुर , बावची आदी गावातील मराठा समाज बांधवांनी परंडा तहसिलदार यांना निवेदन दिले . मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा , लोकप्रितिनिधीनां गावात प्रवेश बंद , मतदानावर बहिष्कार असे ठराव निवेनात मांडले आहेत . मुगाव येथील मराठा व धनगर समाजाने एकत्रित निवेदन दिले आहे .
आधी मराठा बांधवांना आरक्षण द्या मगच गावात या ,आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाचं ; जय जिजाऊ जय शिवराय , जरांगेसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है , आरक्षण नाहीतर मतदान नाही , नो आरक्षण नो इलेक्शन आदि घोषणांनी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक , महाराणाप्रताप चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक , परंडा तहसिल कार्यालय अशी दुचाकी रॅली काढण्यात आली . भगवे झेंड हाती घेवून भगवी टोपी घालून युवक – तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती . विविध घोषणांनी परिसर दुमदुमला होता . वाटेफळ ,आनाळा , हिंगणगाव ( खु) , जेकटेवाडी , कंडारी , मलकापुर ,रोहकल ,लोणारवाडी ,पाचपिंपळा ,पिंपरखेड ,भोंजा कुभेंजा , देवगाव (खु) ,चिंचपुर (खु) , वागेगव्हाण ,लोणी , लोहारा ,राजुरी ,सिरसाव ,तांदुळवाडी , डोंजा , बावची , ,कात्राबाद ,कुंभेफळ , रुई ,सोने कांदलगाव ,पांढरेवाडी , सोनारी , दहिटना ,तांदुळवाडी , मुगाव , कार्ला ,आसू , वाकडी , आवारपिंपरी ,घारगाव , दुधी ,खानापूर, जामगाव ,शिराळा , जाकेपिंपरी , चिंचपूर (बु) ,खंडेश्वरवाडी ,साकत (बु ), धोत्री ,इनगोदा , शेळगाव , माणिकनगर या ४६ गावात बैठका घेऊन मंत्री ,आमदार , खासदार यांना प्रवेश बंदी घातली आहे .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!