स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा : तालुक्यातील डोमगाव येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने मराठा समाजाला आरक्षण सरकार देत नसल्याने नैराश्यातून शुक्रवारी ( दि. २७ ) दुपारी १ वा. सुमारास स्वतः च्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात ही आरक्षणाचा बळी गेला आहे .
याबाबत माहिती अशी कि, शेतकरी बळीराम देविदास साबळे ( वय ४७ वर्ष ) शुक्रवारी सकाळी घरून शेतात जात असताना आपल्याला काही आरक्षण मिळत नाही , मेल्यालं बरं , असे सकाळी कांही ग्रामस्थ गावात बसलेले असताना ते बोलले होते . शेतात गेल्यानंतर दुपारी १ वा. सुमारास त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेतला . जेवण करण्यास का येईनात म्हणून त्यांची पत्नी मिराबाई या शेतात गेल्या असता त्यांनी प्रथमतः ही घटना पाहिली . त्यांनी आरडा ओरड केली . माहिती समजताच कांही ग्रामस्थ शेतकरी घटनास्थळी पोहचले .त्यांचे चुलत भाऊ गणेश साबळे यांनी
या बाबत परंडा पोलीस ठाणे व परंडा तहसिलदार यांना माहिती दिली आहे .
त्यांना दोन मुल आहेत . एक ज्ञानेश्वर हा उच्च शिक्षण घेत आहे . तर दुसरा सिद्धेश्वर हा अपंग आहे . वडील अर्धांगवायु आजार झाल्याने घरातच आहेत . शेती केवळ दीड एकर आहे .
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.