स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले व महाविकास आघाडीच्या विरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथे जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारच्या नेत्यावर त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमा दहन करून आंदोलन करण्यात आले.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी भरती विषयासंदर्भात जो शासकीय आदेश काडुन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यावर व सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर अन्याय, दिशाभूल करणारा होता. तो शासकीय आदेश महाराष्ट्रातील धोरणात्मक निर्णय व जनतेसाठी सकारात्मक काम करण्यासाठी सध्याच्या शिंदे – फडणवीस यांच्या महायुती सरकारने रद्दबादल करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे होणारी मोठी हानी टाळली आहे, त्याचाही यावेळी आनंद करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड जहीर चौधरी, परंडा न.प. मा. गटनेते सुबोधसिंह ठाकूर, ॲड. गणेश खरसडे, ॲड. तानाजी वाघमारे, सरपंच तुकाराम हजारे, युसुफ पठाण, शरद कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव बारस्कर, धनाजी गायकवाड, बाबासाहेब जाधव, साहेबराव पाडुळे, सारंग घोगरे, समीर पठाण, उमाकांत गोरे, श्रीमंत शेळके, अविनाश विधाते, काकासाहेब शिंदे, बाळासाहेब गिरी, ब्रम्हदेव उपासे, पोपट सुरवसे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.