संजय गांधी निराधार(दिव्यांग)योजना लाभार्थ्याचे थकीत अनुदान मिळावे.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परांडा शहर व तालुक्यातील संजय गांधी निराधार (दिव्यांग)अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्याचे जुलै 2023 पासून अद्यापपर्यंतचे वेतन तात्काळ वाढीव अनुदानासह जमा करावे अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके यांच्या समवेत तहसीलदार श्री अडसूळ यांच्याकडे निवेदनाने मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे वेतन जुलै महिन्यापासून मिळालेले नाही तसेच आगामी काळात साजऱ्या होणाऱ्या विविध सणासुदीच्या मुहूर्तावर रखललेले वेतन धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ वाढीव निधी सह वितरित करावे अशी मागणी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आली यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके , तानाजी सांगडे,गोरख देशमाने , गणेश जाधव, रावसाहेब खरसडे, संतोष कुलकर्णी, अशोक भराटे, मधुकर मोटे , हनुमंत खाडे अविनाश शिंदे नूर मोहम्मद तुटके ओंकार शहाणे दत्तात्रय ठोंबरे सत्यवान मासाळ हनुमंत राऊत अनिल खरसडे बाळू दिगंबर काळे रामा थोरबोले सोमा बरकडे विठ्ठल शिरसागर तुळशीदास अंकुश अंबादास हिवरे आधी सह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!