www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत सन २०२३-२०२४ वर्षाकारीता बार्शी तालुक्यातील शेत रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
बार्शी तालुक्यातील शेत शिवाराशी जोडल्या जाणाऱ्या ३९ गावातील एकूण ३९ किलोमीटर लांबीच्या शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेत शिवारात जाण्यासाठी रस्त्याअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो,विशेषतः पावसाळ्यात पक्के रस्ते नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून शेतापर्यंत पोहोचणेही अशक्य होते ही समस्या लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांसाठी मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना कार्यान्वित केली आहे,या योजनेअंतर्गत बार्शी तालुक्यातील
उपळाई ठोंगे,इर्लेवाडी,उक्कडगाव,कळंबवाडी आ,भातंबरे,भोयरे, मळेगाव,मांडेगाव,मालवंडी,मुंगशी वा,रुई,रऊळगाव,वानेवाडी, साकत,सारोळे,सासुरे,सुर्डी,हळदुगे,हत्तीज,शिराळे,कव्हे,काटेगाव,कुसळंब,कोरफळे,खांडवी,गाडेगाव,गाताचीवाडी,गौडगांव,घाणेगाव,घारी,ताडसौंदणे,तावडी,देवगाव,नारी,निंबळक,पांगरी,पुरी,बावी आ,बेलगाव आदी गावातील रस्त्यांची कामे होणार आहेत.
शेत/पाणंद रस्ते मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत शिवारात जाण्याचा मार्ग सुकर होणार आहे.आमदार राजाभाऊ राऊत यांनी शेतकऱ्यांची मोठी समस्या दूर केल्याने शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे साहेब यांचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी आभार मानले..

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.