जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे जागतिक अंडी दिवस साजरा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा दि 13 ऑक्टोबर2023 रोजी महाराष्ट्र शासन,पशुसंवर्धन विभाग,परंडा जि.धाराशिव च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात्राबाद येथे जागतिक अंडी दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर इम्रान पल्ला आणि डॉक्टर जगदाळे आर. ए. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आली.

यावेळी डॉक्टर पल्ला यांनी प्रत्येक वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी जागतिक अंडी दिवस साजरा करत असल्याचे सांगितले.तसेच विद्यार्थ्यांना अंड्याचे महत्त्व पटवून अंड्यामध्ये असलेले घटक आणि मानवी शरीराला त्याचे असलेले महत्त्व तसेच ताजे व शिळे अंडे कसे ओळखायचे हे देखील विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी डॉक्टर जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना आपले शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी अंडी किती महत्वाचे आहेत यासंदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक,शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कापसे सर यांनी मानले.
????????????????????????????????????????????????????????????????

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!