स्वराज्य पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने करमाळा रोडवर रास्ता रोको आंदोलन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा,राज्य सरकारने मंजूर केलेले कांदा अनुदान आंदोलन करून एक महिना झाले तरी न भेटल्यामुळे स्वराज्य पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने करमाळा रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंधरा दिवसात अनुदान वाटप करणार असल्याचे निबंधक कार्यालय यांच्यावतीने कळविण्यात आले.

स्वराज्य पक्षाच्या वतीने कांदा अनुदानासाठी रास्ता रोको च्या दरम्यान पक्षाचे राज्य संपर्कप्रमुख करण भाऊ गायकर आले होते आंदोलन मागे घेण्यासाठी निबंधक कार्यालयाच्या वतीने संजय जाधव हे पत्र घेऊन आले होते परंतु राज्य संपर्कप्रमुख करण भाऊ गायकर यांनी पत्र न स्वीकारता दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करा अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा खरमरीत इशारा दिला.
यावेळी मराठवाडा संपर्कप्रमुख अमर भाई शेख जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे ऍड महेश चोपडे राज्य कार्यकारणी सदस्य बाबा रोटे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर लटके, अनिल मुन्ना माने, प्रदीप नाईकनवरे, बीड जिल्हा प्रमुख राहुल चाळ, राज्य कार्यकारणीी सदस्य विजय अण्णा वावळे , श्याम मस्के, एड किरण पाटील विजय गरड सीताराम सातपुते बापू धनवे पांडुरंग रोड राजेंद्र पाटील, शहाजी साळुंखे श्रीराम धनवे संदीप गरड सचिन कडबने मनोज जगताप श्रीमंत गरड आबा तेलंगे नागनाथ शिंदे दरीबा शिंदे रामगरड आबा तेलंगे नागनाथ शिंदे दरीबा शिंदे रामनिखत कृष्णा धनवेे सुधीर शेळके औदुंबर पाटील बाबुराव गायकवाड तुकाराम बारस्कर महादेव चव्हाण पंडित जगदाळे राहुल गोपने आनंद भोसले ब्रह्मदेव बंडगर परसराम कोळी किशोर पाटील महेश पाटील पृथ्वीराज पाटील धनराज पाटील शुभम पाटील जयराम धनवे आदी शेतकरी व स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!