सिरसाव या ठिकाणी Trumept व्हावा भाजपा नेते क्षीरसागर यांची मागणी

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

परंडा भूम,प्रतिनिधी दिनांक १२/१० २०२३ सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गावर – कळंब- भूम- करमाळा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गावर सिरसाव या ठिकाणी Trumept व्हावा सूरत – चेन्नई या उत्तर – दक्षिण राज्यांना जोडणारा महामार्ग धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील परांडा या तालुक्यातुन प्रस्तावित आहे. हा रस्ता परांडा तालुक्यातुन जात असताना तो कळंब – इटकुर – सारोळा – पारा – वाशी – सरमकुंडी – कुंथलगिरी – भूम – परांडा – अवाटी – करमाळा या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग( पॅकेज 9 सीई/ डीपीआर/ 2017-18/09) या महामार्गावर सिरसाव या ठिकाणाहून जातो.सदरील प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग हा धुळे – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून येत असल्याने संपूर्ण बीड, जालना तसेच अंशत: संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यांसाठी; भूम तालुका, वाशी तालुका यांना चेन्नईकडे जाणाऱ्या ग्रीन कॉरिडॉर ला जोडणारा असल्याने; तसेच भूम मधील सरमकुंडी येथील प्रसिद्ध कुंथलगिरी पेढा भारतातील दक्षिण अथवा उत्तरेत पाठवला जातो; तसेच भूम जवळ 10 km असलेले जैन धर्मियांचे प्रसिद्ध कुंथलगिरी हे तिर्थक्षेत्र दक्षिण आणि उत्तरेला सिरसाव येथून महामार्गाने जोडले जाऊन भूम – परांडा या धाराशिव(उस्मानाबाद) जिल्ह्यातील सर्वात जास्त ज्वारी पिकवणारा भाग समजला जातो,या भागात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.या भागातील ज्वारीस राज्यात खूप मागणी आहे अश्या मागास भागांचा विकास होण्यासाठी सदरील सिरसाव या ठिकाणी Trumept होणे आवश्यक आहे.
याबाबतीत योग्य ती कार्यवाही व्हावी. अशी मागणी भाजपा नेते
बाळासाहेब महादेव क्षीरसागर
भूम,जिल्हा धाराशिव(उस्मानाबाद) यांनी मा.ना.श्री नितीनजी गडकरी
रस्ते वाहतूक मंत्री,
भारत सरकार याच्याकडे पत्राद्वारे केली. ????बाळासाहेब महादेव क्षीरसागर मो. ????9922444082

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!