स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने // शहाजी चंदनशिवे.
परंडा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ने दि.4/10 /2023 ते 7 /10 /2023 या कालावधीत आयोजित केलेल्या युवक महोत्सवात येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.श शिंदे महाविद्यालयाने पोवाडा ,लोकगीत, वक्तृत्व, वासुदेव लावणी, मुक अभिनय,एकांकिका, काव्यवाचन, प्रहसन या कलाप्रकारात भाग घेतला होता .या पैकी मुकाभिनय या नाट्य विभाग कला प्रकारात महाविद्यालयास सांघिक दुसरे बक्षीस मिळाले. या कला प्रकारात कु. काजल फले, निवृत्ती वारे, ओमकार पाटील, दादासाहेब काळे, नारायण शिंदे, पवार अभिषेक, यांनी भाग घेतला होता. एकांकिका कला प्रकारात योगेश सोमण लिखित दृष्टी ही अंधांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी एकांकिका सादर केली. या एकांकिकेतील कु. जेतवणी मिसाळ व संदेश शिंदे यांच्या अंधांच्या केलेल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली यात कु. जेतवणी मिसळला रिया या अंधपात्रासाठी उत्कृष्ट अभिनयाचे द्वितीय तर संदेश शिंदे यांना उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी तृतीयश पारितोषिक मिळाले ही एकांकिका प्रा. संभाजी धनवे यांनी बसवली होती या संघात श्री.भाग्यवान रोडगे, श्री सुमित कटारे ,कानिफनाथ गोरे ,नारायण शिंदे ,पवार अभिषेक, पाटील ओंकार ,अविनाश बारस्क,र रितेश करडे, अविनाश चव्हाण, निवृत्ती वारे, विश्वजीत खामकर, निकिता शिंदे, या विद्यार्थी कलावंतांनी भाग घेतला होता या संघास मार्गदर्शन प्राध्यापक संभाजी धनवे यांनी केले तर संघप्रमुख म्हणून प्रा. डॉ. कृष्णा परभणे व प्रा.डॉ. थोरात वैशाली ,प्रा. नागर सुर्यवंशी .यांनी काम केले. विजयी संघाचे अभिनंदन श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे तर सचिव संजयजी(बप्पा) निंबाळकर, प्राचार्य डॉ. सुनील जाधव , उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, पर्यवेक्षक किरण देशमुख ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे व कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी आजी, माझी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.