www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते तालुक्यातील ममदापूर येथील विविध योजनेच्या माध्यमातून १० कोटी २४ लाख रूपये मंजूर कामाचे उद्घाटन करण्यात आले.
ममदापूर येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत जामगांव ते अरणगांव-पिंपळगांव ते ममदापूर- पांगरी पर्यंत रस्ता करणे यासाठी ९ कोटी ८० लाख, मातोश्री पाणंद योजनेअंतर्गत रस्ता करणे यासाठी २४ लाख मंजूर कामाचे उद्घाटन तसेच २५/१५ योजने मधुन सिमेंट काँक्रीट रस्ता १० लाख,दलित वस्ती सुधार योजना सिमेंट काँक्रीट रस्ता ५ लाख, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ५ लाख इत्यादी कामांचे लोकार्पण करण्यात आले.
बार्शी शहर व तालुक्यात आमदार राजाभाऊ राऊत यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत.यावेळी उपस्थित नागरिकांनी बऱ्याच वर्षांपासून न झालेली कामे ही आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नांमुळे होत असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,रमेश(आण्णा) पाटील,माजी नगरसेवक विलास(आप्पा)रेणके,बाजार समिती संचालक राजेंद्र गायकवाड,प्रभाकर डमरे,अनिल पाटील, बाळासाहेब मोरे,विलास लाडे,सुहास देशमुख,विनोद काटे,अंकुश घोडके,रामलिंग मोरे महाराज,काका खळदकर,शिवाजी सुरवसे, उद्धव घोडके,नवनाथ गिराम,प्रमोद गायकवाड,रमेश खळदकर, बालाजी मोरे,जीवन गायकवाड,बालाजी खळदकर,बालाजी गायकवाड,चंद्रकांत मुळे,शामराव गायकवाड,आप्पा मोरे,सोमनाथ मुळे,आण्णासाहेब मुळे,काशिनाथ गरड,बुवासाहेब खळदकर,उद्धव मुळे,सोमनाथ मोरे,राजेंद्र गायकवाड,अमोल घोडके,अमोल गायकवाड तसेच ममदापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.