www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी दिनांक ५/१०/२०२३बार्शी तालुक्यातील जहानपूर येथील ४५ लाख रुपये मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले व गावच्या विकास कामांसाठी शासनाच्या विविध योजनेतुन मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातुन नागरी सत्कार करण्यात आला.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते जहानपूर ते पांगरी रस्ता करणे यासाठी १५ लाख,जहानपूर ते मलिक साहेब दर्गा रस्ता करणे यासाठी १० लाख,२५/१५ योजने मधुन सिमेंट काँक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख मंजूर कामाचे उद्घाटन व २५/१५ योजने मधुन सिमेंट कॉंक्रीट रस्ता १० लाख कामाचे लोकार्पण करण्यात आले.
गावातील लोकांनी भांडण तंटे विसरून गावच्या विकासासाठी एकत्र यावे,असे झाले तरच खऱ्या अर्थाने गावचा विकास होईल, गावाचे गावपण जपुन मतभेद विसरून गावचा विकास साधा असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी,रमेश(आण्णा) पाटील,माजी नगरसेवक विलास(आप्पा)रेणके,बाजार समिती संचालक राजेंद्र गायकवाड,प्रभाकर डमरे,अनिल पाटील, बाळासाहेब मोरे,विलास लाडे,सुहास देशमुख,विनोद काटे,अंकुश घोडके,रामलिंग सुरवसे,राजेश चव्हाण,वसीम पठाण,जमील पठाण,फुलचंद लोंढे,समद सय्यद उपस्थित होते.



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.