www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी तालुक्यातील शिराळे गावात १ कोटी १२ लाखांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बार्शी तालुक्याचे विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते पार पडला तसेच शिराळे गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
शिराळे येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी व अंतर्गत पाईपलाईन करणे यासाठी ५९ लाख,मातोश्री पाणंद रस्ता योजनेअंतर्गत रस्ता करणे यासाठी २४ लाख,आमदार निधी २५/१५ योजनेअंतर्गत गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ते व गटार करणे यासाठी १० लाख,घनकचरा व्यवस्थापन करणे यासाठी ६ लाख १५ हजार,दलित वस्ती सुधार योजनेतून रोहिदास नगर येथे रस्ता करणे यासाठी ५ लाख,दलित वस्ती सुधार योजनेतून रोहिदास नगर येथे बंदिस्त गटार करणे यासाठी ५ लाख,जि.प.सेस फंड आरोग्य उपकेंद्र दुस्तीसाठी ३ लाख इत्यादी मंजूर विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील गावांकरिता जन-सुविधा योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांमधून,आमदार निधीतून तालुक्यातील ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध केला असुन भविष्यातही मोठ्या प्रमाणात निधीसाठी पाठपुरावा करणार आहे तसेच गावच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करावे, विकासाची जबाबदारी माझी असेल त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,गावातील लोकांनी भांडण तंटे विसरून गावच्या विकासासाठी एकत्र यावे,असे झाले तरच खऱ्या अर्थाने गावचा विकास होईल,असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश(आण्णा)पाटील,माजी नगरसेवक विलास(आप्पा)रेणके,प्रशांत कथले मालक,माजी पंचायत समिती सदस्य सुमंत गोरे,उद्योजक रियाजभाई शेख,शिराळे बाळासाहेब अंकुशे, विविध सेवा सहकारी सोसायटी चेअरमन बालाजी चौधरी,आदिवासी कोळी जमात संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय सुरवसे,भा.ज.पा.तालुका सरचिटणीस डॉ.विलास लाडे, भा.ज.पा. उपतालुका प्रमुख सुहास देशमुख,पांगरीचे सरपंच बाळासाहेब मोरे,शिराळे उपसरपंच अश्रुबा गायकवाड,माजी सरपंच सचिन चौधरी,संजय चौधरी,दयानंद पाटील,अमर पवार, प्रशांत जगदाळे,श्रीपती घुले,नानासाहेब चौधरी,सागर गोडसे, अशोक(नाना)चौधरी,मधुकर चौधरी,नेताजी चंदनशिवे तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.