www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी तालुक्यातील मांडेगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, जलपुजन व नागरी सत्कार समारंभ.बार्शी तालुक्यातील मांडेगाव येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते ७ कोटी ३६ लाख रुपये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.तसेच मांडेगाव गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातून नागरी सत्कार करण्यात आला.
मांडेगाव येथे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते बार्शी-मांडेगाव रस्ता डांबरीकरण करणे यासाठी २ कोटी,पायघन वस्ती ते आगळगांव रस्ता डांबरीकरण करणे यासाठी २ कोटी,के. टी.वे.कोल्हापूर बंधारा करणे यासाठी १ कोटी २० लाख,जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी,अंतर्गत पाईपलाईन करणे यासाठी ८९ लाख,मातोश्री पाणंद योजनेअंतर्गत २ कि.मी.रस्ता करणे यासाठी ४८ लाख,९५/५ योजनेअंतर्गत सिमेंट कॉक्रीट रोड व पेव्हींग ब्लॉक बसविणे यासाठी ४० लाख, आमदार निधी व २५/१५ योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे यासाठी २० लाख,जि.प.शाळा वॉल कंपाऊंड व दुरूस्तीसाठी ६ लाख ७९ हजार,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ४ लाख ९६ हजार, गावांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे यासाठी ४ लाख,दलितवस्ती सुधार योजनेतून सिमेंट काँक्रीट रोडसाठी ३ लाख आदी मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील विविध विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असुन गावा-गावातील भांडण तंटे विसरून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या समस्या सोडवुया असा सल्ला देत मांडेगाव गावातील ज्या ज्या समस्या असतील त्या मला सांगा तसेच बार्शी तालुक्यातील जनतेने लोकप्रतिनिधी म्हणून जी विकास कामांची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती सोडवण्यासाठी मी पुर्णपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली…
यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश(आण्णा)पाटील,माजी नगरसेवक विलास(आप्पा)रेणके,प्रशांत कथले मालक,माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत धस,माजी पंचायत समिती सदस्य सुमंत गोरे,देवगाव माजी सरपंच रामेश्वर मांजरे,भोयरेचे सरपंच दशरथ (पप्पू)टेकाळे, मुकेश डमरे,शिवाजी खोडवे,बापूसाहेब गरदडे,संतोष उमाप,पिंटू मिरगणे,बालाजी सांगळे,जयसिंग माने,हनुमंत कोथमिरे,धनाजी हिरे, दिपक रोंगे,शिरीष बाबर,विकास शिंदे,हनुमंत शेळके, बापूसाहेब गात,बबन गडदे,विशाल रगडे,मांडेगावचे सरपंच पंडित मिरगणे तसेच मांडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.