www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी तालुक्यातील पाथरी येथील ५४ लाख ५१ हजार रुपये मंजूर विविध विकास कामांचे उद्घाटन बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले व गावच्या विकास कामांसाठी शासनाच्या विविध योजनेतुन मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आमदार राजाभाऊ राऊत यांचा कृतज्ञता सोहळ्यातुन नागरी सत्कार करण्यात आला.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याची टाकी,पाईपलाईन करणे यासाठी ४४ लाख ५१ हजार,आमदार निधीतून गावांतर्गत सिमेंट रस्त्यासाठी १० लाख आदी मंजूर कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी,मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील विविध विकास कामे करण्यासाठी प्रयत्नशील असुन गावच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करावे, विकासाची जबाबदारी माझी असेल त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,गावाचे गावपण जपुन मतभेद विसरून गावचा विकास साधा असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रमेश(आण्णा) पाटील,माजी नगरसेवक विलास(आप्पा)रेणके,प्रशांत कथले मालक,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील,बाजार समितीचे माजी सभापती कुंडलिक गायकवाड,पंचायत समितीचे माजी सदस्य सुमंत गोरे,भा.ज.पा.तालुका सरचिटणीस डॉ.विलास लाडे,
भा.ज.पा.उपतालुका प्रमुख सुहास देशमुख,पाथरीचे सरपंच नेताजी गायकवाड,उद्योजक रियाजभाई शेख,आदिवासी कोळी जमात संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय सुरवसे,पुरीचे अमर पवार,घारीचे सरपंच प्रशांत जगदाळे,पांगरीचे सरपंच बाळासाहेब मोरे,बालाजी चौधरी,दयानंद पाटील,अच्युत गायकवाड,धनवंत नाईकनवरे,सागर गोडसे,दिनेश गायकवाड,रावसाहेब सांगोळे, तानाजी गायकवाड,अरूण गायकवाड,हनुमंत गायकवाड,सुंदर जावळे,प्रधुम्न गायकवाड,श्रीकिशन गायकवाड तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.