पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- चिखली दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान व रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी.प्रमुख पाहुणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे व सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली . धर्मराज नगर व परिसरातील अनेक रक्तदात्यांनी आपले रक्त दान केले. व मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनाचा सहभाग लक्षणीय होता. ज्यांची पिंपरी चिंचवड शहरात सिंघम, धडाकेबाज, सामाजिक क्षेत्रात, गोरगरीब जनतेला मदत करणारे आसी ओळख आसनारे एमआयडीसी भोसरी पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे व. ज्यांनी धर्मराज नगर ला पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देणाऱ्या माजी नगरसेविका कै.आलकाताई यादव यांचे सुपुत्र व धडाडीचे
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या सर्व सभासदांना प्रमाण पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. निकाळजे साहेब यांनी सुंदर आसा शब्दात गणपती आपण का? बसवितो त्यांच्या मागच्या काय उद्देश आहे. हे विशेष म्हणजे गणपती बाप्पाचे वर्णन केले. हत्ती एक बलवान व शांतीप्रिय प्राणी आहे. जसे बप्पाचे तोंड गणपतीचे पोट मोठे का कारण सर्व गोष्टी साठवण्याची क्षमता आहे.चार हात का करण दहा जना सोबत लढण्याची क्षमता, हातात दुर्वा म्हणजे पुर्णतः शाकाहारी, येवढ्या मोठ्या गणपतीचे वाहन उंदीर का तर कारण कितीही लहान जीव असला तरी तो मोठ वजन उचलण्याची क्षमता असते.
स्वराज्य प्रतिष्ठान धर्मराज नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कौतुक केले.
सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव यांनी पण मंडळाचे कौतुक करुन काही अडचणी आल्यास मला सांगा असे सांगितले.
निकाळजे साहेब यांनी धर्मराज नगर मधील सर्व जनतेला सांगितले की अर्ध्या रात्री कोणत्याही अडचणी सोडविण्यासाठी मी तयार आहे. तुम्हाला वाचनालय तयार करून देण्याचा शब्द देतो असे सांगितले.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.