पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पुणे:- दि.२३ सप्टेंबर २०२३ पुणे गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि कला आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडवणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हातसे उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिव्हल मधील कार्यक्रमाचा दर्जा आणि कलाकारणारा मिळणारे प्रोत्साहन पाहता हा महोत्सव ५० वर्षे पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करून पर्यटन विभागातर्फे महोत्सवाला यापुढेही सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही श्री महाजन यांनी यावेळी दिली. गणेश कला क्रीडा रंगमंचन येथे आयोजित कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, पुणे फेस्टिव्हल चे अध्यक्ष सुरेश कलमाडी, खासदार पद्मश्री हेमा मालिनी, रजनी पाटील, श्रीरंग बारणे, आमदार नाना पटोले, रवींद्र धंगेकर पुणे फेस्टिवल चे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अभय छाचेड, उल्हास पवार, रमेश बागवे, मेरा कलमाडी आदी उपस्थित होते. पर्यटन मंत्री श्री महाजन म्हणाले सुरेश कलमाडी आणि या महोत्सवाचे घट्ट नाते आहे. ३५ वर्ष असा कार्यक्रम सुरू ठेवणे कठीण कार्य आहे. पण सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक या महोत्सवात सातत्य ठेवले. महोत्सवातील कार्यक्रम पाहता पुणे संस्कृतीचे माहेरघर असल्याचे स्पष्ट होते असे. त्यांनी सांगितले लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. पुणे फेस्टिव्हल ला भेट देण्याची अनेक वर्षापासून इच्छा होती. अशीही श्री महाजन म्हणाले. पुण्यात येऊन नृत्य सादर करणे ही गौरवाची बाब आहे. पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांचा सन्मान होत आहे. अशा शब्दात खासदार हेमामालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खासदार श्रीमती पाटील, श्री बारणे ,आमदार पटोले, पद्मभूषण डॉ. के एल संचेती, उद्योगपती संजय घोडवत, यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. श्री कलमाडी यांनी स्वागतपर भाषणात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे नाव देशात जावे या उद्देशाने पुणे फेस्टिव्हल ची सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगितले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!