www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी- भारतरत्न डॉ. सर मोषगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६३ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून सिविल इंजिनियर असोशीएशन बार्शी कडून अभियंता दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतधिकारी पडदूने साहेब कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण साहेब, प्रमुख उपस्थिती येवनकर स्टील चे अमित यवनकर, राजुरी स्टील जालना चे मार्केटिंग हेड अजित जोशी, टेकनिकल हेड गोविंद पल्लोड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पडदुने साहेब यांनी विश्वकर्मा ते आजचा अभियंता, विश्वनिर्मितीच्या वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला. मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाणसाहेब यांनी अभियंत्याच्या अडचणी सोडवण्यास कटीबद्ध असल्याचे नमूद केले. राजुरी स्टीलचे टेकनिकल हेड गोविंद पल्लोड यांनी टीएमटी बाणि टोर स्टीन मधील फरक स्पष्ट करत झपाट्याने तंत्रज्ञान विकसित होत आहे प्रत्येक बांधकामात चे महत्वाचे योगदान असून त्यातही रोज नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. सदरचा कार्यक्रम राजुरी स्टील जालना यांनी प्रायोजित केला.
सिविल इंजीनियर असोसीएसन बार्शी ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नूतन अध्यक्ष -मुख्तारभाई शेख उपाध्यक्ष – दत्तात्रय आगवणे सचिव शकीलभाई शेख खजिनदार – विनोदकुमार मिसाळ यांची निवड करण्यात आली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकीलभाई शेख यांनी केले. प्रस्तावना निलेश फुले यांनी यांनी केली. आभार प्रदर्शन सारंग कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश वाघमारे संदेश मोंडे महेश नांदेडकर अभिजित कुलकर्णी किरण सातपुते अमर काळे प्रशांत देशपांडे, प्रशांत हिरे अय्याज शेख प्रभाकर कुलकर्णी प्रशांत देशपांडे सलमान आत्तार कुंदन राऊत श्रीकांत कुलकर्णी गणेश तांबे भीमाशंकर शेटे उमेश जाधव कल्याण देशपांडे एजाज शेख मनीष रुपले जयंत देशमुख दीपक गरड यांनी परिश्रम घेतले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.