पिंपळे सौदागरमध्ये वीजेच्या धक्क्याने ३ शेळ्यांच्या मृत्यू, महावितरणच्या

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पिंपळे सौदागर दि. २० सप्टेंबर २०२३ पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॉलनी गावठाण बीआरटीएस मार्गालगत शेळ्यांचा कळप घेऊन जाताना रस्ता लागत असणाऱ्या महावितरणाचा डीपी बॉक्स मधील वायरचा शॉक लागून ३शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. मेढपाळाने दिलेल्या माहितीनुसार सर्वात प्रथम एक बकरी त्या डीपी बॉक्स जवळ जाऊन कोसळली त्याला वाटले तिला चक्कर आली असेल त्यामुळे मेंढपाळ त्या शेळीला पाहण्यासाठी जवळ गेला असता त्याला सुद्धा विजेचा धक्का बसला व तो बाजूला फेकला गेला. सदैव आणि नशीब बलवतर म्हणून मेंढपाळाचा या दुर्गंध दुर्घटनेत जीव वाचला परंतु पुन्हा त्या जागी त्याच कळपातील आणखी दोन शेळ्या गेल्यावर मेंढपाळाच्या डोळ्यासमोर त्या त्यांचा देखील विजेचा धक्का लागून जीव गेला. यात महावितरण विभागाच्या हलगर्जीपणा मुळे तीन शेळ्यांच्या दुर्दैव मृत्यू झाला. ही बातमी कळतात माझी विरोध विरोधी पक्षनेते, नगरसेवक विठ्ठल नाना काटे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन हलगर्जीपणा करणाऱ्या महावितरणाच्या कर्मचारी ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी तसेच त्या मेंढपाळात झालेल्या नुकसानीचे भरपाई देण्यात यावी. अशा सूचना संबंधित महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी यांना केल्या तसेच त्वरित योग्य ती कारवाई करून सदर डीपी बॉक्स बदलून नवीन डीपी बॉक्स बसवण्यात यावा व विश्वशांती कॉलनी गावठाण मधील महावितरणांची वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खाबांवरुन असणार्या वायर या अंडरग्राउड कराव्या अशा देखील सुचना महावितरण विभागास नाना काटे यांनी केल्या आहेत..

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!