आ.बच्चू कडू 21 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
धाराशिव दि.20 सप्टेंबर 2023:-दिव्यांग कल्याण मंत्रालयांतर्गत ” दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी ” या अभियानाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे 21 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 8 वाजता शासकीय विश्रामगृह सोलापूर येथून शासकीय वाहनाने धाराशिवकडे प्रयाण.सकाळी 8:30 वाजता तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे प्रहार जनशक्ती पक्ष संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतील. सकाळी 10 वाजता धाराशिव येथील छत्रपती संभाजीनगर मार्गावरील छायादीप लॉन येथे आयोजित दिव्यांग कल्याण कार्यक्रमाला उपस्थिती. दुपारी 4 वाजता प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला भेट. दुपारी 4 :30 वाजता प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या प्रहार संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देतील. दुपारी 4:45 वाजता जत्रा फंक्शन हॉल,सांजा रोड,धाराशिव येथे आयोजित महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन मेळाव्याला उपस्थित राहतील. सायंकाळी 6 वाजता धाराशिव येथील गुजर गल्ली, गावलीवाडा येथे बाल हनुमान गणेश मंडळ येथे दिव्यांग स्पर्धा बक्षिस वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!