पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.१४ सप्टेंबर २०२३ पिंपरी चिंचवड शहरातील ‘सिम्बा’करणार गुन्हे प्रकटीकरणासाठी मदत तर घातक कारवायांवर तर ‘ जेम्स’ ठरणार भारी तब्बल पाच पर्षांच्या प्रतिक्षेनंतर शरह पोलीस दलात झाले सिम्बा आणि जेम्स श्र्वान.शहर पोलीस दलात नुकताच दोन नवीन अधिकाऱ्यांचा समावेश झाला आहे.सिम्बा आणि जेम्स अशी नावे आहेत.पोलिस आयुक्तालयाला सुरू होऊन पाच वर्षे उलटल्यानंतर अखेर या अधिकाऱ्यांची नेमणूक शहर पोलिस झाली आहे.पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची निर्मिती झाली.१५ ऑगस्ट २०१८ रोजी ते कार्यान्वित देखील झाले.पाच वर्षं उलटून गेली तरी देखील आयुक्तालय उद्याप अनेक बाबींसाठी धडपड आहे.वरिष्ठ पातळीवर यासाठी पाठपुरावा सुरू असुन एका पाठपुरिव्याला नुकतेच यश आले आहे. श्र्वान पथकाच्या निमित्ताने दोन श्र्वान अधिकारी शहर पोलिस दलात दाखल झाले आहेत.
‘सिम्बा’ हा श्र्वान गुन्ह्यांशी निगडीत काम करणार आहे. चोरी, घरफोडी, खून यांसारख्या गुन्ह्याचा घटनास्थळी जाऊन आरोपींचा माग काढने,हे त्याचे मुख्य काम असणार आहे.गुन्ह्याची उकल करण्यासाठी सिम्बा कटिबद्ध आहे.त्याच्यासोबत त्याचे दोन हॅँडलर आहेत.प्रत्येक सिम्बाची १२-१२ तास काळजी घेईल जेम्स’ हा श्वान बॉम्ब शोधक नाशक पथकात (बीडीडीएस) काम करणार आहे. त्याच्या सोबत देखील दोन हॅँडलर आहेत. सिम्बा प्रमाणेच प्रत्येक हॅँडलर त्याची 12-12 तास काळजी घेईल. त्यांचे डाएट, व्यायाम, प्रशिक्षण, औषधे अशा प्रत्येक गोष्टीची काळजी हे हॅँडलर घेणार आहेत.
पोलीस दलात असणाऱ्या श्वानांना सुरुवातीपासून जो हॅँडलर सांभाळतो, त्याचेच ते ऐकतात. त्यामुळे हे श्वान जिथे जातात तिथे त्यांचे हॅँडलर सावलीप्रमाणे सोबत असतात.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.