पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण कथा सोहळ्याची जय्यत तयारी

Picture of starmazanews

starmazanews


पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- दि.१४ सप्टेंबर २०२३ चिंचवड मध्ये महाराष्ट्र मध्ये प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा विनामूल्य श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळा पिंपरी चिंचवड मध्ये होत आहे. त्यामुळे तमाम शिवभक्तांची उत्कंठा शिगेला पोचली असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिव कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे शहरात आगमन झाले आहे. शहरवासीयांच्या वतीने त्यांचे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी स्वागत केले. पिंपरी चिंचवड शहरातील लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवार यांच्या वतीने श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन दिनांक १५ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत पीडब्ल्यूडी मैदान नवी सांगवी येथे केले आहे. परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिवपुराण कथा मोफत वाचन सोहळा आहे. मध्य प्रदेश येथील परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी पिंपरी चिंचवड वाशी यांना मिळणार आहे. पंडित मिश्रा यांचे लाखो अनुयायी कथेचे श्रवण करण्यासाठी येणार आहेत. या दिवसांमध्ये सुमारे ८ ते ९ लाख श्रोते या कथेचे श्रावण करतील. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठित केली आहे. त्यामध्ये २५ उप समित्या आहेत.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!