पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर.
पिंपरी चिंचवड:- दि.८ सप्टेंबर २०२३ जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरीत मराठा क्रांती मोर्चा ने उपोषण सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना येथील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी शांततेच्या व कायदेशीर मार्गाने आंदोलनाला बसलेल्या महिला भगिनी, लहान मुले व वय वृद्धांवर जो अमानुषपणे लाठी चार्ज करण्यात आला याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड सह महाराष्ट्रात सर्व ठिकाणी निषेध करण्यात आला आहे. मराठा समाजामध्ये प्रचंड चिड निर्माण झाली आहे. आणि अनेक शहरात बंद पुकारण्यात आला होता. असे असताना देखील सरकारने अद्यापही मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नाही असा पवित्रा म्हणून जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यांना पाठबळ मिळावे त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सतीश काळे व अनेक समन्वयक गुरुवारपासून पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उपोषण करत आहेत .सतीश काळे यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे प्रकाश जाधव, लहू लांडगे, जीवण बोराडे, नकुल भोईर, अभिषेक मस्के, सागर तापकीर, लक्ष्मण रानवडे, वैभव जाधव, सुनिता शिंदे, गोपाळ मोरे, रविशंकर उबाळे, सुनील शिंदे, लक्ष्मण पांचाळ, दीपक कांबळे, योगेश पाटील, निलेश शिंदे, स्वप्निल परांडे, प्रवीण कदम, वासुदेव काटे पाटील, अमोल निकम, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपोषणामध्ये बसले आहेत, यावेळी उपोषण करताना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम तसेच राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी भेट देऊन मराठा समाजाच्या मागण्यास पाठिंबा दिला आहे, कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर गेकर यांनी उपोषण चळे भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. आंदोलन कर्त्याच्या मागण्या मान्य होईपर्यंत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.