परंडा येथे दिव्यांगांना विविध कृती अवयव व जीवन उपयोगी साहित्याचे वाटप.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दि (09) रोजी पंचायत समिती कार्यालय येथे केंद्र शासनाच्या ADIP योजनाच्या माध्यमातून एल्मिको जनरल इन्शुरन्स कंपनी मुंबई सहकार्याने तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आ.राणाजगजीतसिंह पाटील मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना या साहित्याचे वाटप करण्यात आले आशा या विविध साहित्याचे मोजमाप स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृह परांडा येथे घेण्यात आले होते त्यानुसार पात्र दिव्यांग 154 लाभार्थी यांना साहित्य वाटप करण्यात आले हे साहित्य वाटप करत असताना पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री.नागटिळक साहेब, सौ.कदम मॅडम श्री.जोगदंड साहेब समाज कल्याण विभाग प स परांडा श्री.भांडवलकर व इतर कर्मचारी तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तानाजी घोडके भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष समाधान मते उपाध्यक्ष विठ्ठल गायकवाड व उस्मानाबाद येथून आलेली डॉक्टर तज्ञ टीम व भारतीय जनता पार्टीचे विविध कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामसेवक सरपंच यांनी पुढाकार घेऊन आपल्या गावातील दिव्यांगाचे साहित्य दिव्यांगापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मोलाचे सहकार्य केले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे पदाधिकारी तानाजी सांगडे, संतोष कुलकर्णी रावसाहेब खरसडे अशोक भराडे गोरख देशमाने भूषण महाजन भाजपा परांडा शहर कार्यकर्ते बप्पा रगडे तुकाराम हजारे ईसुप पठाण, प्रहार नूतन जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे आप्पा तरटे आधी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पाडला .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!