कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वराज्य संघटनेचे रास्ता रोको आंदोलन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
राज्य सरकारने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे प्रति क्विंटल 350 रुपये प्रमाणे शेतकऱ्यास अनुदान देण्याचे ठरविले आहे.
परंतु परंडा तालुक्यातील काही शेतकरी विरोधी वृत्तीच्या व्यक्तींनी आपल्या गावातील राजकीय द्वेषापोटी तक्रारी देऊन दुष्काळग्रस्त अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवले आहे. काही ठराविक शेतकऱ्यांमुळे हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तक्रार असलेल्या शेतकऱ्यांबाबत आपण योग्य निर्णय द्यावा व तक्रार नसलेल्या शेतकऱ्यांना गणपतीव तक्रार नसलेल्या शेतकऱ्यांना गणपतीव तक्रार नसलेल्या शेतकऱ्यांना गणपतीपूर्वीव तक्रार नसलेल्या शेतकऱ्यांना गणपतीव तक्रार नसलेल्या शेतकऱ्यांना गणपतीपूर्वी त्वरित अनुदान वाटप करावे, अन्यथाज्य संघटना व सबंध परंडा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बाजार समिती समोर करमाळा रोडवर सोमवार दिनांक 11/09/23 रोजी सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
असे लिहिले आहे.
हे निवेदन तहसीलदार परांडा यांचे मार्फत कृषी पणन विभाग, पुणे. जिल्हाधिकारी, धाराशिव. जिल्हा निबंधक, धाराशिव. पालकमंत्री धाराशिव पोलीस निरीक्षक, परंडा सहाय्यक निबंधक, परंडा यांना दिले आहे
निवेदनावर मराठवाडा संपर्कप्रमुख अमर भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर लटके, तालुका अध्यक्ष अश्रू कातुरे, पांडुरंग गरड, शहाजी साळुंखे, श्रीराम धनवे, संदीप गरड, सचिन कडबने, मनोज जगताप, श्रीमान गरड, आबा तेलंगे, नागनाथ शिंदे, दरीबा शिंदे, रामा निकत, कृष्णा धनवे, सुधीर शेळके औदुंबर पाटील, बाबुराव गायकवाड, तुकाराम बारस्कर, महादेव चव्हाण, पंडित जगदाळे, राहुल गोफने, अंगद भोसले ब्रह्मदेव बंडगर, परसराम कोळी, शुभम पाटील, धनराज पाटील, जयराम धनवे, पृथ्वीराज पाटील आदींच्या सह्या आहेत.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!