स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा,ता.७ सप्टेंबर धाराशिव जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती पहाता पिके करपलेल्या अवस्थेत व सुकलेल्या अवस्थेत परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना सरसकट अनुदान व २५ टक्के सरसकट पिक विमा अग्रीम रक्कम देण्यात यावं तसेच
धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिक करपू लागली आहेत अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट अनुदान जाहीर करावे तसेच २०२०-२०२१-२०२२ मध्ये बजाज अलायन्स कंपनी व भारतीय विमा कंपनी (AIC) विमा कंपनी यांनी शेतकऱ्यांना रक्कम वितरीत करण्यासाठी जी नाट्यमय भुमीका घेतली ती आता या वर्षीच्या २०२३ मधील एच डी एफ सी ईर्गो कंपनी ने घेऊ नये मागील पंधरा ते वीस दिवसांच्या पाऊस खंडामध्ये जिल्ह्यातील ३६ मंडळातील जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बांसे व जिल्हा कृषी अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविंद्र माने आणि एच डी एफ सी ईर्गो पिक विमा कंपनी मधील समन्वयक, तालुका कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व शेतकरी सदस्य यांच्या पहाणी अहवालात सरासरी ५३ टक्के नुकसान झाले असून एच डी एफ सी ईर्गो कंपनी ने शेतकऱ्यांनच्या खरीप हंगामातील संरक्षित पिकांना २५ टक्के अग्रीम रक्कम तर देणं बंधनकारक आहेच परंतु पिकांची परिस्थिती पहाता आणखी आणखी २५ टक्के रक्कम देणं बंधनकारक आहे यासाठी ५०% टक्के रक्कम शेतकर्यानां येणाऱ्या १० दिवसांत ५३३ कोटी रुपये सर्व मंडळात देण्यासाठी केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार व एच डी एफ सी ईर्गो विमा कंपनी ने येणाऱ्या पंधरा दिवसांत तरतूद करावी व थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने व उपसंचालक अभिमन्यु काशिद यांच्या सोबत श्री गणेश बॅंक सेवा केंद्र व श्री पाटील बुवा जि प प्रोडुसर कंपनी लि भोंजा हवेली चे डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.