स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी डॉ शहाजी चंदनशिवे
प्रतिनिधी
परांडा दि . 6 सप्टेंबर 2023 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये संस्थापक अध्यक्ष कै . रा गे शिंदे गुरुजी यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त तालुकास्तरीय भव्य विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी रामेश्वर विद्यालय शिराळा येथील मुख्याध्यापक नारायण कडेकर हे उपस्थित होते तर ग्रंथ प्रदर्शनासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून छत्रपती संभाजी विद्यालय गोंडरे हे उपस्थित होते .याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव प्रोफेसर डॉक्टर हरिश्चंद्र गायकवाड सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शहाजी चंदनशिवे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने कनिष्ठ भागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख प्रा विलास गायकवाड हे उपस्थित होते .
विज्ञान प्रदर्शनाचे समन्वयक प्रा अमर गोरे पाटील यांनी आयोजन केले तर ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख यांनी केले होते ग्रंथालयातीलअनिल जानराव संतोष राऊत विशाल नलवडे उपस्थित होते .दि . 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त डॉ राधाकृष्ण सर्वपल्ली यांना अभिवादन करण्यात आले तर रा गे शिंदे गुरुजी यांच्या जीवनावर आधारित रामकृष्ण महाविद्यालयाचे प्रा डॉ ए डी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले .याच अनुषंगाने महाविद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर ही आयोजित करण्यात आले होते .या रक्तदान शिबिराचे आयोजन प्रा डॉ सचिन चव्हाण व प्रा किरण देशमुख यांनी केले होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230906-WA0044.jpg?resize=800%2C451&ssl=1)
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230906-WA0048.jpg?resize=800%2C360&ssl=1)
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230906-WA0045.jpg?resize=800%2C451&ssl=1)
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230906-WA0041.jpg?resize=800%2C451&ssl=1)
![](https://i0.wp.com/starmazanews.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230906-WA0046.jpg?resize=800%2C360&ssl=1)
![starmazanews](https://secure.gravatar.com/avatar/4fda7f8e27869db8a392615e0d2c6001?s=96&r=g&d=https://starmazanews.com/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.