रा गे शिंदे गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी.

starmazanews_v

starmazanews_v


(पारंपारिक पोशाख वारकरी दिंडी न्यायालय आणि लेझीम पथक या कार्यक्रमाने भव्य रॅलीचे विशेष आकर्षण )
स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी. डॉ शहाजी चंदनशिवे

परांडा दि 7 सप्टेंबर 2023 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै . रा गे शिंदे गुरुजी यांची 99 जयंती शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली .
संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते रा.गे . शिंदे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले . ही रॅली महाविद्यालयातून बावची चौक खासापुरी चौक विविध कार्यकारी सोसायटी मार्गे मंडई पेठ ते जिल्हा परिषद शाळा ते शिवाजी चौक व तेथून बाऊची चौक ते महाविद्यालय अशा पद्धतीने विविध कार्यक्रमाचे देखावे करत विसर्जन करण्यात आले .जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे व प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . या रॅलीचे प्रमुख कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख आणि वरिष्ठ विभागाचे प्रोफेसर डॉ एच.एम. गायकवाड यांनी सर्वांच्या सहकार्याने सुंदर आयोजन केले होते . सर्व महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वांनी जयंती उत्सवामध्ये सहभागी होऊन जयंती उत्सव साजरा केला . यामध्ये महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक दीपक ओव्हाळ यांनी विद्यार्थिनींचे लेझीम पथक तयार केले होते . शहरांमध्ये ठीक ठिकाणी चौकात या लेझीम पथकाचे प्रदर्शन करण्यात आले .
यामध्ये प्रा शंकर अंकुश (आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड अम्बेसिडर ) युनेस्को एसडीसी 17 मधील सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अंतर्गत क्वालिटी एज्युकेशन आणि प्रा संभाजी धनवे राज्यस्तरीय ब्रँड अँबेसेडर या दोघांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल चे सादरीकरण केले होते . या जयंतीच्या औचित्य साधून महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर वरिष्ठ लिपिक बाबासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले .
या रॅलीमध्ये कनिष्ठ वरिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सर्वांना आवाहन केले की पुढच्या वर्षी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिंदे गुरुजी यांची शंभरावी जयंती उत्सव साजरी करण्यात येईल . महाविद्यालयामध्ये पुतळा उभारण्यात येईल .तसेच महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर सर्व विषयाचे वर्ग चालू करण्यात येतील असे त्यांनी सांगितले . महाविद्यालयाच्या जडणघडणीसाठी संस्था कमी पडणार नाही असे त्यांनी या ठिकाणी ठामपणे सांगितले . विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे महाविद्यालय परिपूर्ण आहे व यापुढेही आणखीन जी काही सुधारणा करता येईल ती सुधारणा नक्कीच केली जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट मत व्यक्त केले . यावेळी उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ शहाजी चंदनशिवे प्रा विलास गायकवाड प्रा डॉ बाळासाहेब राऊत ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख प्रा संभाजी धनवे प्रा दीपक हुके प्रा तानाजी फरतडे प्रा संतोष भिसे प्रा डॉ अतुल हुंबे प्रा डॉ विद्याधर नलवडे प्रा डॉ प्रकाश सरवदे प्रा डॉ अरुण खर्डे प्रा डॉ गजेंद्र रंदील प्रा डॉ कृष्णा परभने प्रा उत्तम कोकाटे प्रा जगनाथ माळी प्रा डॉ प्रशांत गायकवाड यांच्यासह प्राध्यापिका डॉ वैशाली थोरात प्राध्यापिका सुरेखा सातव प्राध्यापिका शेख यांच्यासह महाविद्यालयातील अनेक कनिष्ठ वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
शेवटी सर्वांनी सहकार्य केल्यामुळे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले .

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!