पंकजाताई मुंडे शनिवार ९ सप्टेंबरला परंड्यात.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

पंकजाताई मुंडे शनिवार ९ सप्टेंबरला परंड्यात शिवाजी चौकात स्वागत व मा. आ. ठाकूर यांच्या निवासस्थानी भेट.

परंडा:- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या “शिव-शक्ती परिक्रमा” प्रवासाच्या निमित्ताने शनिवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९.१५ वाजता परंडा शहरात येत आहेत. मा. पंकजाताई मुंडे यांचे परंडा शहरात सकाळी ९.१५ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वागत करण्यात येणार आहे. स्वागतानंतर त्या मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या ‘संवाद’ निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी शनिवार ९ सप्टेंबर रोजी स. ९.१५ वा. स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष श्री. राजकुमार पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अनिल पाटील युवा मोर्चा शहराध्यक्ष ॲड. श्री. संदीप शेळके यांनी केले आहे.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!