स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने // शहाजी चंदनशिवे
परांडा दि . 2 सप्टेंबर 2023 येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे संस्थापक अध्यक्ष कै . रा गे शिंदे गुरुजी यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . जयंतीनिमित्त दि 3 सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान बुद्धिबळ स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा विज्ञान प्रदर्शन ग्रंथ प्रदर्शन रक्तदान शिबिर वैज्ञानिक जाणीव व दृष्टीकोण आणि दि ७ सप्टेंबर रोजी शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . या रॅलीमध्ये बैलगाडी मध्ये मिरवणूक काढण्यात येत आहे .झांज पथक लेझीम पथक या रॅलीचे खास आकर्षण असणार आहे . या कार्यक्रमासाठी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर अध्यक्ष सुनील शिंदे संस्थेच्या सहसचिव मंगल उर्फ शीलाताई देठे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे . जयंतीनिमित्त कार्यक्रमांमध्ये आयोजीत केलेल्या विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा . स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले आहे .
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.